अजित पवार यांच्या टोल्यानंतर राऊत नरमले; म्हणाले, ‘आमच्याकडेही फेविकॉलचा मजबूत जोड’

| Updated on: Jun 19, 2023 | 3:26 PM

त्यांनी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोला लगावताना, राऊत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरून आता चर्चा रंगली आहे.

मुंबई : वरळी येथे पार पडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिबीरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मविआबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी स्वतःचे सरकार स्थापन करण्याचा इरादा बोलून दाखवला आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोला लगावताना, राऊत यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावरून आता चर्चा रंगली आहे. यामुद्द्यावरून राऊत यांनी छेडलं असता, त्यांनी, दादांचा म्हणणं बरोबर आहे. अजितदादा हे सुप्रिया सुळे ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे ते बिग बॉस आहेत. महाविकास आघाडीतले महत्त्वाचा घटक आहेत. तर आम्हाला जे काही बोलायचं होतं ते कालच्या मेळाव्यात बोललो आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या मनात जोपर्यंत मविआत राहायचं आहे तोपर्यंत ती राहिलं. ती 25 वर्षापेक्षा जास्त काळही राहिलं. यासाठी वारंवार आम्ही बोलतोय, पवार साहेब, काँग्रेसचे नेते म्हणतात की मविआ टिकली पाहिजे. मग चुकलं काय? आम्हाला एकत्र येत भाजपसह या गद्दार गटाला या मातीमध्ये गाडायचं आहे आणि आम्ही तसेच करणारा आहोत. मग अजित पवार यांच्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आपण सगळे एक आहोत एकत्र राहू. शिंदे गटाकडंच फक्त फेविकॉलचा जोड आहे असे नाही तो महाविकास आघाडीतही आहे.

Published on: Jun 19, 2023 03:26 PM
“40 गद्दारांनी तुमच्या सहकार्याने गद्दारी केली, गद्दार दिनासाठी UN कडे मागणी करा”, ठाकरे गटाचं कोश्यारींना पत्र
“ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका