सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु

| Updated on: Oct 19, 2024 | 4:46 PM

कोकणातील राणे समर्थक समजले जाणारे राजन तेली यांनी भाजपातून शिवसेना उद्धव ठाकरे गटात काल प्रवेश केला आहे. त्यानंतर सावंतवाडी मतदार संघावर ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीतील कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.

नारायण राणे समर्थक मानले जाणाऱ्या राजन तेली यांचा भाजपातून काल ठाकरे गटात प्रवेश झालेला आहे. सावंतवाडी मतदार संघावर आता शिवसेना ठाकरे गटाने दावा केलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे आणि त्यांच्या सर्मथकांनी सावंतवाडी मतदार संघात लढण्याची इच्छा व्यक्त करीत नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर गाठले आहे. यावेळी अर्चना घारे यांनी आपण गेली दहा वर्षे या मतदार संघात कार्यरत आहे. आम्ही शरद पवार यांना भेटून आमच्या मागण्या त्यांच्या कानावर घालणार आहोत. सायंकाळी या संदर्भात पवार साहेब योग्य तो निर्णय घेतील असेही घारे यांनी म्हटले आहे. हा मतदार संघ जर शिवसेनेला सुटला तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार का ? असा सवाल केला असता अर्चना घारे यांनी शरद पवार यांच्याशी बोलल्यानंतर सायंकाळी निर्णय घेऊ असे उत्तर दिले आहे.

Published on: Oct 19, 2024 04:42 PM