VIDEO : शिवसेना वर्धपनाला शिंदे गटाची जय्यत तयारी; शिवसैनिकांसाठी खास मेजवानीही

| Updated on: Jun 19, 2023 | 12:40 PM

आजपर्यंत शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापनाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. एक ठाकरे गटाकडून तर दुसरा शिंदे गटाकडून. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला आज 57 वर्षे पूर्ण झाली. मात्र आजपर्यंत शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्धापनाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. एक ठाकरे गटाकडून तर दुसरा शिंदे गटाकडून. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन साजरा होणार आहे. याची जय्यत तयारी केली जात असून आज परत ठाकरे गटाला धक्का लागण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटातील अनेकांचा पक्ष प्रवेश होईल असे सांगण्यात येत आहे. तर यादरम्यान वर्धापन दिनानिमित्ताने राज्यभरातून साधारण 15 हजार कार्यकर्ते गोरेगाव येथे येणार आहेत. या आलेल्या कार्यकर्त्यांच्या खाणपणाची व्यवस्था देखील शिंदे गटाने चोख केलेली आहे. शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवण्याचं काम जोरात सुरू आहे. पहा काय काय असेल मेजवाणीत…

Published on: Jun 19, 2023 12:40 PM
“मतांसाठी औरंगजेबाचं उदात्तीकरण”, आंबेडकरांच्या कृतीवर भाजप नेता भडकला
ठाकरे-शिंदे गटात नवा संघर्ष; वर्धापनदिनी मातोश्रीबाहेर दोन्ही गटाकडून बॅनरबाजी!