Anand Dave | Shivsena – Sambhaji Brigade युतीवर आनंद दवेंचे टीकास्त्र – tv9
राज्याच्या राजकारणात कधी काहीही होऊ शकते. शिवसेना भाजप युती तुटली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडत शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपला शिंदे गट बनवला आणि शिंदे-फडणवीस सरकार बनवले. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये नवे राजकीय समिकरण जन्माला आले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती. या […]
राज्याच्या राजकारणात कधी काहीही होऊ शकते. शिवसेना भाजप युती तुटली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मिळून महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पाडत शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपला शिंदे गट बनवला आणि शिंदे-फडणवीस सरकार बनवले. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये नवे राजकीय समिकरण जन्माला आले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती. या युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी केली. त्यावरून आता शिवसेनेवर टीका होत आहे. अशीच टीका ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केली आहे. यावेळी दवे म्हणाले, शिवसेनेचा हा निर्णय अतिशय चुकीचा आणि दुर्दैवी आहे. तसेच शिवसेनेवर टीका करताना, जब नुकसान संघटन का आता है तब पहिले विवेक मर जाता है असे म्हटलं आहे. तसेच संभाजी ब्रिगेडवर निशाना साधताना दवे म्हणाले, जातीपातीचे सर्वाधिक घाणेरडे राजकारण जर कोणी सुरू केलं असेल तर ते संभाजी ब्रिगेड यांनी. दादोजी कोंडदेव, राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडण्याचं काम आणि तोडल्यानंतर जबाबदारी घेण्याचं काम हे संभाजी ब्रिगेडने केलं होतं. आणि आता तिच संभाजी ब्रिगेड ही शिवसेनेला जवळची वाटत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातला हा दुर्दैव दिवस असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.