बाळासाहेबांचा फोटो नाही? “ही शिवसेना नाही तर मोदी यांची ‘शवसेना’”; शिंदे यांच्यावर कोणाची घणाघाती टीका
शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. मात्र यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे यांना घेरलं जात आहे.
मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तर सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. मात्र यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे यांना घेरलं जात आहे. तसेच टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो का नाही असा सवाल देखील केला जात आहे. असाच सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या जाहिरातीत नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे, पण बाळासाहेबांचा फोटो नाही. शिवसेना ज्यांचे नाव घेत आहे, त्या बाळासाहेबांचा फोटो यामध्ये नाही. मग ही शिवसेना कोणाची? असा सवाल राऊत यांनी शिंदे यांना केला आहे. तर आता ही शिवसेना शिंदे यांची नाही तर मोदी, शाहांची सेना आहे. त्यामुळे त्यांचा खरा मुखवटा उघड झाला आहे. ही तर मोदी यांची ‘शवसेना’असल्याचा घणाघात राऊत यांनी केला आहे.