Special Report | राज्यसभेसाठी शिवसेनेनं दोन्ही अर्ज भरले, संभाजीराजे माघार घेणार?-TV9

| Updated on: May 26, 2022 | 9:08 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरल्याप्रमाणं करतील, असं संभाजीराजे म्हणाले होते..पण आता शिवसेनेकडूनच संजय राऊत आणि संजय पवारांनी राज्यसभेच्या 2 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राऊत आणि पवारांनी अर्ज दाखल केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरल्याप्रमाणं करतील, असं संभाजीराजे म्हणाले होते..पण आता शिवसेनेकडूनच संजय राऊत आणि संजय पवारांनी राज्यसभेच्या 2 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत राऊत आणि पवारांनी अर्ज दाखल केला…आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकणार, असं राऊतांनी म्हटलंय. अपक्ष म्हणून मदत करण्यास शिवसेनेनं संभाजीराजेंना नकार दिला..तर शिवसेनेत जाण्यास संभाजीराजे तयार झाले नाही. त्यामुळं संभाजीराजेंना उमेदवारी मिळाली नाही. आता संभाजीराजे काय करणार, हाच प्रश्न सर्वांना पडलाय. संभाजीराजेंनी 2 ट्विट केलेत. शिवराज्याभिषेक सोहळा. 6 जून चलो रायगड आणि दुसरं ट्विट त्यांनी शिवाजी महारांजासमोर नतमस्तक झाल्याचा फोटो टाकून केलंय..

महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय. मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी. मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…शिवसेनेनं दोन्ही उमेदवार दिल्यानं आता संभाजीराजे अपक्ष अर्ज दाखल करणार नाही, अशी चर्चा आहे. त्यासंदर्भात संभाजीराजे पत्रकार परिषद घेऊनच आपली भूमिका स्पष्ट करतील..मात्र स्वराज्य घडवायचंय, असं सूचक ट्विट केल्यानं संभाजीराजे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यसभेऐवजी आगामी निवडणुकांमध्ये मैदानात उतरतील असं दिसतंय. संभाजीराजेंसमोर सध्या दुसरा पर्याय नाहीय…कारण संभाजीराजेंना शिवसेनेनं पाठींबा दिला नाही तर भाजपनं अजून पूर्णपणे भूमिका स्पष्ट केली नाही. अर्ज दाखल करण्यासाठी 10 आमदारांचं अनुमोदनही संभाजीराजेंना जमवता आलं नाही. त्यामुळं संभाजीराजे अपक्ष अर्ज न भरता माघार घेणार असं बोललं जातंय.

 

Published on: May 26, 2022 09:08 PM
Special Report | 13 तास ईडीकडून चौकशी, Anil Parab यांचं काय होणार?-TV9
तिसरी जागा लढू आणि जिंकूच