अमरावतीचा खासदार बदलला पाहिजे, पाहा रवी राणांवर कोणी केली टीका

| Updated on: Jan 14, 2024 | 7:12 PM

खासदार रवी राणा यांच्या विरोधात अमरावतीच्या जनतेत नाराजी आहे. यंदा भाजपाला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 405 चा खासदारांचा आकडा द्यायचा असेल तर अमरावती लोकसभेचे तिकीट रवी राणा यांना देऊ नये अशी मागणी महायुतीच्या एका नेत्याने खळबळ उडाली आहे. खासदार रवी राणा आणि त्यांची आमदार पत्नी नवनीत राणा यांनी भाजपाला मदत केली असल्याने आता रवी राणा यांच्या तिकीटावर महायुतीत वाद सुरु झाले आहेत.

अमरावती | 14 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूका तोंडावर असल्याने लोकसभेच्या जागांसाठी सर्व पक्षांची तयारी सुरु आहे. यातच आता महायुतीतच जागांवरुन रस्सीखेच सुरु झाली आहे. महायुतीतील शिवसेना गटाचे नेते आनंदराव अडसुळ आणि रवी राणा दाम्पत्याचं सख्य सर्वांनाच ठाऊक असताना आता अडसुळांचे पूत्र अभिजित अडसूळ यांनी अमरावतीतील जनता खासदार रवीराणा यांच्या विरोधात नाराज असल्याचे म्हटले आहे. जर मोदींसाठी 405 लोकसभा जागा जिंकण्याचे मिशन पूर्ण करायचे असेल तर अमरावतील बदल हवा असे त्यांनी म्हटलं आहे. याआधी माझे वडील आनंदराव अडसुळ पाच टर्म येथील खासदार राहीलेले आहेत त्यामुळे शिवसेनेलाच खासदारकीचे तिकीट मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. मला किंवा माझ्या वडीलांना तिकीट द्यायचे याचा निर्णय सर्वस्वी पक्षानेच घ्यावा असेही अभिजीत अडसुळ यांनी म्हटले आहे.

Published on: Jan 14, 2024 07:11 PM
राऊतांचं मोती बिंदूचं ऑपरेशन आम्हालाच करावं लागेल, पाहा कुणी केली टीका
उद्धव ठाकरे यांच्या सोबतही एक मंथरा आहे…त्याचं काय होईल, देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका