Bhaskar Jadhav | ‘मुस्लिम समाजानं डोकं शाबूत ठेवून ठाकरेंच्या पाठीशी उभं राहावं’
आता मुस्लिमांना कळून चुकलं की खऱ्या अर्थाने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच महाराष्ट्राला पाहिजेत असं म्हणत मुस्लिमांना शिवसेने बरोबर येण्याचं आमंत्रणच भास्कर जाधव यांनी देऊन टाकले.
हिंगोली : कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या अमित शहांनी हिंदूंचा गणपती उत्सव धूम धडाक्यात सुरू असताना याकूब मेमनच्या कबरीचा विषय काढला. त्यावेळी मी मुस्लिम बांधवांनी डोकी शांत ठेवा असे आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंचा सरकार ज्यांपद्धतीने चाललं, उद्धव ठाकरे यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय दिला. त्यानंतर मुस्लिमांचा शिवसेने प्रतीचा विचार बदलला. आता मुस्लिमांना कळून चुकलं की खऱ्या अर्थाने शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच महाराष्ट्राला पाहिजेत असं म्हणत मुस्लिमांना शिवसेने बरोबर येण्याचं आमंत्रणच भास्कर जाधव यांनी देऊन टाकले.
Published on: Sep 12, 2022 10:09 PM