Uday Samant स्टंटबाजी करतात आणि सुरक्षा वाढवून घेतात
उदय सामंत हे स्टंटबाजी करणारे आहेत. प्रत्येक वेळी अशी स्टंटबाजी करून घ्यायची आणि संरक्षण वाढवून घ्यायचं, असे भास्कर जाधव म्हणाले.
हिंगोली : उदय सामंतांना मिळालेल्या धमकीबाबत भास्कर जाधव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत सारखा भंपक माणूस मी कधी बघितला नाही. मागच्या वेळी मंत्रिमंडळ बसताना माझ्या गादीवर दगडफेक झाली, असं सांगून पोलीस स्वरक्षण वाढवून घेतलं. थोरातांवर आक्षेप घेऊन स्वतःच स्वरक्षण वाढवून घेतलं, त्या अगोदर सुद्धा मला आठवते. उदय सामंतला धमक्या द्यायला आहे कोण उदय सामंत त्याला धमक्या द्यायला ? उदय सामंत हे स्टंटबाजी करणारे आहेत. प्रत्येक वेळी अशी स्टंटबाजी करून घ्यायची आणि संरक्षण वाढवून घ्यायचं, असे भास्कर जाधव म्हणाले.
Published on: Sep 12, 2022 10:31 PM