Kishori Pednekar On Viral Photo | रौफ मेमन व्हायरल फोटोवर किशोरी पेडणेकरांचे स्पष्टीकरण

Kishori Pednekar On Viral Photo | रौफ मेमन व्हायरल फोटोवर किशोरी पेडणेकरांचे स्पष्टीकरण

| Updated on: Sep 10, 2022 | 10:06 PM

देशाबद्दल एवढं प्रेम म्हणता मग अमित शहा याच्या मुलांनी झेंडा हाती घेतला नाही, तेव्हा हि बारा तोंड होती कुठे शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे.

मुंबई : किशोरी पेडणेकर यांचा रौफ मेमनसह फोटो व्हायरल झाला आहे. बडा कबरस्तान आणि जुमा मशिदशीच्या बैठकीतील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळते. बडा कबरस्तान आणि जुमा मशिदशी संबंधित नसतानाही रौफ मेनन बैठकत उपस्थित कसा? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी मशीदमध्ये गेली होती, कब्रस्तानमध्ये नाही. मशीदमध्ये पाणी भरलं होतं तेव्हा आम्ही पालिकेच्या टीम सोबत गेलो होतो. भाजपची दहा तोंड खोटं बोलत आहेत. मशीदमध्ये कोण गुंड प्रवृत्तीचा होता, मला माहित नाही. मिळवायचं आहे तर कामाने मिळवा उगाच बदनाम करू नका. प्रत्येक गोष्ट शोधून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर करत रहा. देशाबद्दल एवढं प्रेम म्हणता मग अमित शहा याच्या मुलांनी झेंडा हाती घेतला नाही, तेव्हा हि बारा तोंड होती कुठे शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे.

Published on: Sep 10, 2022 10:05 PM
Ulhasnagar Yuva Sena | उल्हासनगरातील युवासेना पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाला पाठिंबा
VIDEO : 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 11 September 2022