मोदींच्या ‘एक है तो सेफ है’ घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले की तुमच्या येण्याने…

| Updated on: Nov 09, 2024 | 6:07 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा दिली असून तिला महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे पंतप्रधान मोदी यांनी 'एक है तो सेफ है' अशी नवीन घोषणा केली आहे, त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्यावेळी भाजपाला मोठा फटका बसला होता, त्यामुळे हिंदु-मुस्लीम सामाजिक ध्रुवीकरण करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली असून तिचा त्यांनी महाराष्ट्रात देखील प्रचार केला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषणेत बदल करुन ‘एक है तो सेफ है’ अशी नवीन घोषणा केलेली आहे. या घोषणेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. बटेंगे तो कटेंगे या घोषणेला आमच्या येथे लोकांनी फेकून दिले आहे असे संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ अशी घोषणा केली आहे. तुम्ही एक कोणाला करीत आहात आणि कोणाला सेफ करीत आहात मोदी. या राज्यातील सगळी जनता तुमची नाही का ? या देशाची सगळी जनता तुमची नाही ? आम्ही सेफ आहोत महाराष्ट्रात, आणि आम्हाला जास्त सेफ व्हायचं आहे, म्हणून भाजपाला महाराष्ट्रातून घालवयचं आहे. उलट तुमच्या येण्याने आम्ही अनसेफ होऊन जातो. कारण आम्हाला माहिती आहे. तुम्ही येथे येऊन लोकांना भडकविणार, लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देणार, ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या घोषणा देणार. तुम्ही जोपर्यंत या राज्यात आहात आम्ही अनसेफ आहोत म्हणून आम्ही तुम्हाला या राज्यातून फेकून देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी त्यांना अनसेफ वाटत असेल तर पाकिस्तानात जावे असे उत्तर दिले आहे.

 

Published on: Nov 09, 2024 06:06 PM
भाजपा – शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, संजय राऊत यांची सनसनाटी टीका
‘साहेबांचा नाद केला आता…’, धनंजय मुंडे यांना हरवा; शरद पवार उतरले मैदानात