इशाऱ्यांची भाषा राज ठाकरे यांनाच कळते…काय म्हणाल्या सुषमा अंधारे

| Updated on: Aug 10, 2024 | 6:35 PM

बच्चू कडू यांचा स्वत:चा पक्ष आहे त्यामुळे ते कोणाला बांधील नाहीत. त्यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी आमचे वरिष्ठ घेतील असे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी राज्यातील दोन मोठे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या मोठी टिका केली आहे. मनोज जरांगे यांच्या आड या दोन नेत्यांचे राजकारण सुरु आह अशी टिका राज ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात केली आहे. या टिकेवर शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपली प्रतिक्रीया देताना राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात त्यांना मराठा बांधवाच्या अडवणूकीला सामोरे जावे लागल्याने त्यांना कदाचित फस्ट्रेशन आलेले असावे अशी टिका केली आहे. त्या पुढे म्हणाल्या की राज ठाकरे यांनी मोहोळ उठविण्याचे काम करु नका असा इशारा शरद पवार आणि ठाकरे यांना दिला असला तरी अशी इशाऱ्यांची भाषा त्यांच्यात आणि देवेंद्रजी यांच्यात तसचे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात सुरुच असते अशी टिका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. एकीकडे लाडकी बहिण म्हणायचे दुसरीकडे आपल्या मणिपूरच्या महिला असो की, खेळाडू विनेश फोगाट असो वा गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर एका महिलेला देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवतारे यांनी केलेली मारहाण आणि पोलिस उघडया डोळ्यांनी पाहातात. हे पाहात महिलांना यांच्या 1500 रुपयांपेक्षा सुरक्षेची खरी गरज आहे अशी टिका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Published on: Aug 10, 2024 06:34 PM
‘अजित पवारांना सोबत घेऊन विधानसभा…,’ काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
‘या’ ठिकाणी 100 टक्के पराभव, हा शब्द… त्यांच्या मतदारसंघात मराठ्यांचं मताधिक्य; जरांगेंनी चॅलेंज देत दिला गंभीर इशारा