अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या शिवतारे यांच्याकडून कौतूक? शिवतारे म्हणतात, ‘मला दादांचा आदर…’

| Updated on: Aug 07, 2023 | 11:42 AM

याचदरम्यान एकाच व्यासपीठावर शिवसेना नेते विजय शिवतारे देखील असणार आहेत. त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक आता एकाच व्यसपीठावर येणार असल्याने सध्या बारामतीत चर्चा होताना दिसत आहे.

पुणे, 7 ऑगस्ट 2023 | जेजूरी येथे शासन आपल्या दारी हा शासकीय कार्यक्रम होणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाला असणार आहेत. याचदरम्यान एकाच व्यासपीठावर शिवसेना नेते विजय शिवतारे देखील असणार आहेत. त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक आता एकाच व्यसपीठावर येणार असल्याने सध्या बारामतीत चर्चा होताना दिसत आहे. यावरून शिवतारे यांनी अजित पवार यांच्यात आणि माझ्यात काही बांदाचं भाडंण नाही. आमच्याच वैचारीक मतभेद आहेत. तर तो काही टोकाचा नाही. पण गेल्या दोन वर्षात अजित पावर आणि माझ्यात जो काही वाद झाला. त्याची फिटम फाट झाली असून मी अजित पवारांचा प्रशसंक आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या बदलाच्या चर्चांवर बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात भाजपचे नेते भाजपचे चाणक्य यांनी आधीच सांगितलं आहे की 2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री रहाणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पण नंतर बलाबल काय होतं याच्यावर भविष्य ठरेल असेही शिवतारे यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 07, 2023 11:42 AM
राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल; नाना पटोले यांचा भाजपवर टोला; म्हणाले, “कुसत्तेच्या विरोधात गांधींचाच विजय”
पांढऱ्याशुभ्रम दाट धुक्यात हरवला लोहगड परिसर, बघा मनाला भुरळ पाडणारी विहंगम दृश्ये