Ambadas Danve : नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात; अंबादास दानवेंचा घणाघात
शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी नारायण राणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. ते भाजपाने (BJP) टाकलेल्या तुकड्यावर जगतात असा टोला त्यांनी राणेंना लगावला आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. या टीकेला पत्रकार परिषद घेऊन भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी नारायण राणेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांना फार गंभीरतेने घेण्याची गरज नाही. ते भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात असा टोला त्यांनी राणेंना लगावला आहे.
Published on: Jul 27, 2022 09:34 AM