Bhaskar Jadhav | गणेशोत्सवात गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांचे आवाहन
Bhaskar Jadhav | गणेशोत्सवात गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केले आहे.
Bhaskar Jadhav | सध्या कोकणात गौरी-गणपतीच्या (Gauri Ganpati) उत्सवाची कोण लगबग सुरु आहे. चाकरमान्यांनी अगोदरच आपआपल्या गावाकडे कूच केली आहे. त्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक व्यवस्था (Travel)ही केली. रेल्वे, बससेच्या हजारो फेऱ्या कोकणाकडे (Kokan) धावल्या आहेत. एवढेच काय वेळ पडल्यावर चाकरमान्यांनी खासगी वाहनांआधारे गाव जवळ केला आहे. शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर येथील कोकणवासीयांनी लगबगीने घर गाठले आहे. कोकणकडे माणसांचे थवेच थवे येत आहेत. बस स्थानक, रेल्वे स्थानक गर्दीने फुलून गेले आहे. प्रत्येकाला दहा दिवसांच्या गणपती उत्सवाने उत्साह संचारला आहे. सण आनंदाने कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी चाकरमान्यांनी कसरत केली आहे. उद्या गणपतीच्या आगमनाने हा उत्साह शिगेला पोहचणार आहे. गणेशोत्सवात गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन, शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी केले आहे.