‘ते’ तर निजामाचे अवलाद, त्यांना काय माहित बाळासाहेब कोण? संजय शिरसाट यांचा कोणावर पलटवार
शिवसेनेचे नेचे आमदार संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर हल्ला चढवत जलील हे निजामाचे अवलाद आहेत. ते हैद्रबादवरून आलेत त्यामुळे त्यांना बाळासाहेब कोण हे माहित नाहीत.
छ. संभाजीनगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर असे नामांतरण करण्यात आल्यानंतर एमआयएमकडून विरोध करण्यात आला. तसेच येथे साखळी उपोषण केले जात आहे. यावरून खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता त्यांनी औरंगजेब आणि नवे नाव आमच्यावर लादले जात आहे असे म्हटलं होतं. त्याचबरोबर त्यांनी कशाला मागणी करता तुमचं सरकार आहे असेही म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी कोण बाळासाहेब असेही म्हटलं होतं. त्यावर आता शिवसेनेकडून जोरदार टीका केली जात आहे. यावरून शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर हल्ला चढवत जलील हे निजामाचे अवलाद आहेत. ते हैद्रबादवरून आलेत त्यामुळे त्यांना बाळासाहेब कोण हे माहित नाहीत. पण हेच जर जगाच्या कोणत्याही माणसाला बाळासाहेब ठाकरे कोण असे विचारलं तर ते उत्तर देतील असंही शिरसाट म्हणाले.
Published on: Mar 07, 2023 04:38 PM