‘…म्हणूनच बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढलाय; राऊत यांच्यावर कुणाचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेतच शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी ठाणे रूग्णालयात झालेल्या रूग्णांच्या मृत्यूवरून शिंदे गटावर टीका केलीय.
औरंगाबाद : 16 ऑगस्ट 2023 | ठाणे येथील रूग्णालयात एका रात्रीत १८ आणि त्यानंतर दुसऱ्या रात्रीत पुन्हा ४ असे २२ रूग्णांचा मृत्यू झाला. ज्यामुळे राज्यातील अरोग्यविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. तर यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे-भाजप-पवार सरकारवर टीका केली जातेय. याचवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, शिंदे गटामुळे राज्याचे राजकीय आरोग्य बिघडलं आहे. तर राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील कोमात घालवण्याचें काम शिंदे सरकारनं केल्याची टीका राऊत यांनी केली आहे. यावरून शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी टीकेला उत्तर दिलं आहे. शिरसाट यांनी, राज्याचं राजकीय आरोग्य किंवा जनतेचं आरोग्य बिघडलेलं नाही. उलट राऊत यांचं राजकीय आरोग्य बिघडलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केलाय असा पलटवार त्यांनी केला आहे. याचबरोबर राऊत यांनी केलेल्या टीकेला शिरसाट यांनी आणखीन काय प्रत्युत्तर दिलं आहे ते पाहा या व्हिडीओत…