अयोध्या पौळ यांनी बांगर यांना करून दिली ‘त्या’ चॅलेंजची आठवण..; काय आहे पहा चँलेज आणि काय आणलं पहा गिफ्ट
कळमनुरी बाजार समितीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 5 जागा, तर महाविकास आघाडी 12 जागेवर विजयी झाली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यानंतर एकच जल्लोष केला आहे.
हिंगोली : शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) हे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अशातच आता बांगरांची पुन्हा एकदा नाव चर्चा सुरू आहे. ती त्यांनी केलेल्या चॅलेंजमुळे. नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींचा निकाल लागला. यात बांगर यांचा समिती बालेकिल्ला ढासळला आहे. कळमनुरी बाजार समितीत (Kalmanuri Market Committee) भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 5 जागा, तर महाविकास आघाडी 12 जागेवर विजयी झाली आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यानंतर एकच जल्लोष केला आहे. तर यावेळी बांगर यांनी 17 पैकी 17 जागा आपण निवडणून आणू नाहीतर मिशा काढू असं चॅलेंज दिलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ (Ayodhya Paul) यांनी बांगर यांना डिवचलं आहे. तसेच त्या चॅलेंजची आठवण करून देत आपण 20 रूपयं खर्च करून दाडी करायचं खोरं आणलं आहे. फक्त तुझ्यासाठी दादुड्या. कधी काढणार मिशा? काढ हा, म्हणत टोला लगावला आहे.