Priyanka Chaturvedi on Shinde | घटनेचे नियम तोडून शिंदे सरकार अस्तित्वात, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
Priyanka Chaturvedi on Shinde | घटनेचे नियम धाब्यावर बसवत राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याची घणाघाती टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी यांनी केली आहे.
Priyanka Chaturvedi on Shinde | घटनेचे नियम धाब्यावर बसवत राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) अस्तित्वात आल्याची घणाघाती टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वैदी (Priyanka Chaturvedi) यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बदलत्या भूमिकेचा चौफेर समाचार घेतला. आतापर्यंत शिंदे गट हा राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेससोबत(Congress) गेल्यानेच सत्तेतून बाहेर पडल्याची ओरड करत होता. सत्ता स्थापन होताच आता ते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला लागेल. यावरुन त्यांची भूमिका काय आहे हे दिसून येते याकडे लक्ष वेधत त्यांनी शिंदे यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी महत्वाच्या पदावर बसवलं. त्यांच्यावर विश्वास टाकला. पण त्यांनी बंडखोरी केली आणि पक्षाचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. कोर्टात त्यांची ही वारंवार बदलणारी भूमिका उघडी पडली आहे. सत्तेच्या मोहापायी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप ही चतुर्वैदी यांनी केला.