Sanjay Raut | औरंगजेब आता अचानक सरकारचा कधीपासून नातेवाईक झाला? नामांतर निर्णय स्थगितीवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

| Updated on: Jul 15, 2022 | 2:44 PM

Sanjay Raut on Namantar News : शिवसेना नेते संजय राऊत यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतर निर्णयाला नवीन सरकारने स्थगिती दिल्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

Raut attack on Shinde Fadnavis : “औरंगजेब आता अचानक सरकारचा कसा नातेवाईक झाला? औरंगजेब नेमका तुमचा कोण लागतो की तुम्ही त्या निर्णयाला स्थगिती देतायेत” अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली. महाविकास आघाडीने औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर (Sambhaji nagar) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला एकनाथ शिंदे सरकारनं स्थगिती दिल्याचं वृत्त आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला धारेवर धरले. ते नागपूर येते पत्रकारांशी बोलत होते. नामांतरावरुन शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असा अपप्रचार करण्यात आला, मग आता त्यांनीच औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर का थांबवलं? असा टोला त्यांनी हाणला.

हे सरकार गोंधळलेलं

राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बाण सोडले. तेच खरे तर सरकार चालवत आहेत, शिंदे हे नामधारी मुख्यमंत्री असल्याचा आरोप करत त्यांनी हे सरकार गोंधळलेले आहे. त्यामुळेच ते महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देत सूटल्याचा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार असल्यानेच सरकारचा गोंधळ उडाल्याचे त्यांनी सांगितलं. ‘काय साध्य केलंय हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. एकिकडे हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करतायत आणि दुसरीकडे हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले, त्यांना स्थगिती कशासाठी देतायत? राजकीय निर्णय समजू शकतो. आर्थिक विषयही समजू शकतो. पण हे निर्णय कशासाठी घेतले? असे विचारत त्यांनी सरकारला अडचणीत आणले आहे.

लग्न वेळेवरच लावायचं, पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेव निघाला
Dipak Kesarkar: जुन्या आठवणींना दिला उजाळा, शरद पवारांबद्दल मी कधीच अपशब्द वापरले नाहीत- दीपक केसरकर