राऊतांना कार्ट म्हणत भाजप नेत्याने बेळगावच्या मराठी माणसाला काय केलं आवाहन?
भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांचा कार्ट असा उल्लेख केला आहे. तर राऊत हे घाणेरडे राजकारण करतात. त्यांनी पवार कुटुंबामध्ये देखील घाणेरडे राजकारण केलं असा घणाघात केला आहे.
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे बेळगाव दौऱ्यावर आहेत. ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या जाहीर प्रचारासाठी जात आहेत. त्यामुळे ते यावेळी कोणावर सडकून टीका करणार आणि कोणाला निशाना करणार याची चर्चा आता बेळगावसह महाराष्ट्रातही सुरू आहे. यावरूनच भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांचा कार्ट असा उल्लेख केला आहे. तर राऊत हे घाणेरडे राजकारण करतात. त्यांनी पवार कुटुंबामध्ये देखील घाणेरडे राजकारण केलं असा घणाघात केला आहे. तर राऊत हे आज नालायक सारखा बेळगावला जात आहेत. त्यामुळे आपले बेळगावच्या मराठी माणसाला आबवाहन आहे की, त्यांनी राऊत यांना जाब विचारावा. त्यांना विचारावं की, अरे बाबा तू इथे येतोय मराठी माणसासाठी येतोय पण काय झालं त्या पत्राचाळीतल्या लोकांचे?
Published on: May 03, 2023 12:36 PM