‘डेथ वॉरंट’वर राष्ट्रवादी नेत्याचे स्पष्टीकरण, राऊत दिल्लीत काम करतात, त्यांच्याकडे माहिती असेल, पण हे सरकार…

| Updated on: Apr 24, 2023 | 2:26 PM

शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही. या सरकारला धोका नाही, असे म्हटलं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलू शकतात असे त्यांनी म्हटलं आहे.

नाशिक : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुढील 15 दिवसांत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडेल, त्यांचा डेथ वॉरंट निघाला आहे, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी, आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी हे शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही. या सरकारला धोका नाही, असे म्हटलं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात 16 आमदार अपात्र झाले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलू शकतात असे त्यांनी म्हटलं आहे. तर राऊत यांच्या खळबळजनक वक्तवावर बोलताना, राऊत दिल्लीत काम करतात. ते संपादक आहेत. त्यांच्याकडे माहिती येत असते. परंतु, मुख्यमंत्री बदलाबाबत आपल्याला काही माहिती नाही. सध्यातरी मुख्यमंत्री बदलले जाणार अशी परिस्थिती नाही, असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 24, 2023 02:26 PM
एकीकडे अवकाळीनं बळीराजा उद्ध्वस्त तर ‘या’ जिल्ह्यात समाधानी, काय आहे दिलासा मिळण्याचं कारण?
BMC नं भांडुपला गाडी पाठवून ‘त्यांच्या’ जिभेची नसबंदी करावी, संजय राऊत यांच्यावर कुणाची जहरी टीका?