Shivsena : शिवसेना पक्षप्रमुख विधानभवनात दाखल, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे विधानभवनात

| Updated on: Aug 23, 2022 | 8:09 PM

महापालिका निवडणुक तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी यासारख्या विविध मुद्द्यांवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ आदित्य ठाकरे देखील त्यांच्याबरोबर होते. निवडणुका, सरकारचे निर्णय यावरुन ही बैठक महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय खलबते होतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच आज विधानभवनात दाखल झाले होते. विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे दाखल होताच अनेकांना एकच गर्दी केली होती. महाविकास आघाडीच्या बैठकीला ते उपस्थित राहिले आहेत. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका आणि महाविकास आघाडीची रणनिती या विषयावर आधारित बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. महापालिका निवडणुक तसेच सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी यासारख्या विविध मुद्द्यांवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ आदित्य ठाकरे देखील त्यांच्याबरोबर होते. निवडणुका, सरकारचे निर्णय यावरुन ही बैठक महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय खलबते होतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Published on: Aug 23, 2022 08:09 PM
Supriya Sule| विरोधी आमदारांच्या त्या घोषणा आता सुप्रिया सुळे यांच्याही मुखात- tv9
Raj Thackeray : ‘निशाणी असो अथवा नसो’ विचारांचा वारसा पुढे घेऊन जायचयं..