Bharat Gogawale On Anant Gite | अनंत गीते यांना भरत गोगावले यांच प्रत्युत्तर – tv9
जर आम्ही चुकलो नसेल तर हीच जनता आम्हाला साथ घेऊन चालेल असा विश्वास असल्याचेही भरत गोगावले म्हणाले.
सध्या राज्यातील राजकारण हे शिवसेना विरूद्ध शिंदे गटांच्या भोवताली फिरताना दिसत आहे. शिवसेना नेते हे शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातूच अनंत गीते यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर देताना, भरत शेठला बाटलीत भरण्याइतपक मोठी बाटली नाही आणि बाटलीत भरणारा पैदा ही झाला नाही असे म्हटले आहे. त्याचबरोबर जर आम्ही चुकलो असेन तर जनता त्याचा फैसला करेल. मात्र जर आम्ही चुकलो नसेल तर हीच जनता आम्हाला साथ घेऊन चालेल असा विश्वास असल्याचेही भरत गोगावले म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधताना, ते शिवसेना संपवायला निघालेत असेही म्हटलं आहे.
Published on: Aug 21, 2022 09:29 AM