cabinet expansion : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार बांगर काय बोलून गेले? का रंगली आही इतकी चर्चा?

| Updated on: Jun 24, 2023 | 4:15 PM

याच्याआधी ते एका फोन कॉलवरून चांगलेच चर्चेत आले होते. आताही ते एका कारणामुळे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र ते मंत्रिमंडळ विस्तारावरून चर्चेत आले आहेत.

हिंगोली : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. याच्याआधी ते एका फोन कॉलवरून चांगलेच चर्चेत आले होते. आताही ते एका कारणामुळे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र ते मंत्रिमंडळ विस्तारावरून चर्चेत आले आहेत. त्यांनी नांदेडमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या तयारीच्या बैठकीत काही असं बोललं की त्यावरून नव्या चर्चांना उत आला आहे. बांगर बैठकीला मार्गदर्शन करताना म्हणाले की येणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात हा तुमचा आमदार मंत्री पद घेतल्या शिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे की हा मराठवाड्याचा नेता आम्हाला मंत्री पदावर न्यायचाय. त्यामुळं सध्या मराठवाड्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

Published on: Jun 24, 2023 04:15 PM
‘…सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले’; शिंदे यांची ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
महामोर्चावरून शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरे यांच्यावर एका वाक्यात टीका; म्हणाला…