गुलाबराव पाटील यांचा दगड राज्यात थेट केंद्रात जाणार? केंद्रीय गृहमंत्र्यांनाच याची तक्रार? कोणी दिला इशारा

| Updated on: Apr 24, 2023 | 7:05 AM

यावेळी राऊत यांच्या एका टीकेली पाटील यांनी उत्तर देताना, आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत संजय राऊत यांना आंदोलन कसं करतात माहित नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गट या ना त्या कारणाने समोर येताना दिसत आहे. काल ठाकरे गटाची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या होमग्राऊंडवर सभा झाली. याच्याआधीत पाचोरा आणि जळगावमध्ये राजकारण चांगलेच तापलेलं होतं. खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दीक चकमक उडालेली होती. यावेळी राऊत यांच्या एका टीकेली पाटील यांनी उत्तर देताना, आम्ही दगड मारून सभा बंद करणारे लोक आहोत संजय राऊत यांना आंदोलन कसं करतात माहित नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. तर यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस देखील चांगलीच आक्रमक झालेली दिसली. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याची जाहीर निषेध तर केलाच. तसेच महाराष्ट्रात अशू गुंडागर्दी नही चलेगी म्हटलं होतं. तसेच हा विषय आपण केंद्रीय गृहमंत्र्यांनाच सांगू असेही त्या म्हणाल्या. पहा त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 24, 2023 07:05 AM
अरे बाबा, तुझे पोट दुखायचं काय कारण? अजित पवार पत्रकारावरच भडकले? अमृता फडणवीस यांच्याशी काय संबंध?
संजय राऊत यांची लायकी नाही, ‘या’ मंत्र्यानं केली पाचोऱ्याच्या सभेतील भाषणावर सडकून टीका