थुंकण्यासाठी शिल्लक सेनेवर आधी प्रॅक्टीस करा; शिवसेना महिला नेत्याचा राऊत यांना खरमरीत सल्ला
विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राऊत यांना पानपिचक्या मारल्या. याचदरम्यान आता शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेत आक्रमक झाले आहेत. यावरूनच मागाठाणे विधानसभा मतदारसंघात राउत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने प्रश्न विचारल्यानंतर थुंकले. यावरून आता राज्यातील राजकारण आता चांगलेच तापलेलं आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राऊत यांना पानपिचक्या मारल्या. याचदरम्यान आता शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेत आक्रमक झाले आहेत. यावरूनच मागाठाणे विधानसभा मतदारसंघात राउत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी राऊत यांना खरमरीत सल्ला दिला. राऊत यांनी थुंकण्यावर गुन्हा आहे का असं म्हटलं होतं. त्यावर पलटवार करताना, आधी आपल्याच तोंडावर थुंका, नसेल तर थुंकण्यासाठी शिल्लक सेनेवर आधी प्रॅक्टीस करा असं म्हटलं आहे. त्याचबरोबर आता फक्त त्यांच्या बँनरला जोडे मारले आहेत. परत जर अशा पद्धतीने वर्तन केलं गेलं तर त्यांच्या तोंडावर जोडे मारू असा इशारा दिला आहे.