घोडा मागे अन् गाडी पुढे कशी? सुप्रीम कोर्टात वकिलांनी दिलेलं उदाहरण काय?

| Updated on: Sep 27, 2022 | 12:02 PM

आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणी प्रलंबित असताना सरकार कसं स्थापन होऊ शकतं, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी केला.

नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टात (Supreme court) आज शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिंदे गट (CM Eknath Shinde ) या खटल्यावर जोरदार युक्तिवाद सुरु आहे. कोर्टात याचिकेवर सुनावणी सुरु झाली तेव्हा शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. ज्येष्ठ वकील सिंघवी यांनी केलेल्या युक्तिवादादरम्यान त्यांनी घोडागाडीचा दाखला दिला. ज्या आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरुआहे. त्यांनीच विधीमंडळात बहुमत घेऊन सरकार स्थापन करणे म्हणजे उलट्या घोडागाडीसारखं आहे, असं ते म्हणाले. इथे गाडी पुढे आणि घोडा मागे, असं कसं होऊ शकतं? आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणी प्रलंबित असताना सरकार कसं स्थापन होऊ शकतं, असा सवाल अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. आज त्यांनी केलेला युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.

Published on: Sep 27, 2022 12:02 PM
“विलिनीकरण न केल्यास अपात्रतेचाच विचार होतो”, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद
शिंदेगटाचे वकीलांचा युक्तीवाद सुरु, नीरज कौल काय म्हणाले? पाहा…