शिवसेनेने एकनाथ शिंदे गटासोबत जावं
दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याचे ट्विट केले आणि शिवसेनेसह इतर पक्षामध्येही जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर राज्याच्या खेडोपाडी पसलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही दीपाली सय्यद यांचे ट्विट म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना असल्याचे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तमाम शिवसैनिकांचे मत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी […]
दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याचे ट्विट केले आणि शिवसेनेसह इतर पक्षामध्येही जोरदार चर्चा सुरु झाली. त्यानंतर राज्याच्या खेडोपाडी पसलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही दीपाली सय्यद यांचे ट्विट म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांची भावना असल्याचे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तमाम शिवसैनिकांचे मत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावे अशीच इच्छा त्यानी व्यक्त केली आहे. दीपाली सय्यद यांनी ज्या प्रकारे ट्विट केले आहे त्या प्रकारे शिवसेनेमध्ये याआधीच घडले पाहिजे होते असंही मत त्यांनी मांडले आहे. त्यामुळे दीपाली सय्यद यांचे ट्विट म्हणजे सामान्य शिवसैनिकांचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Jul 17, 2022 07:08 PM