सुषमा अंधारे या भावूक झाल्या, त्यातून ‘ती’ तक्रार; रूपाली पाटील ठोंबरे यांचे वक्तव्य
मात्र महाविकास आघाडी तर विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांनी आवाज उठवला नाही, अशी त्यांची तक्रार आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत शरद पवार यांच्याकडे जाहिर तक्रार केली. अंधारे यांच्यावर भर विधानसभेत अपशब्द वापरण्यात आले होते. मात्र महाविकास आघाडी तर विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांनी आवाज उठवला नाही, अशी त्यांची तक्रार आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी अजित पवार यांच्या सांगण्यावरून आम्ही अंधारे यांच्यासाठी आवाज उठवला. पण काल त्या भाऊ-बहिण्याच्या नात्याप्रमाणे भावावर रागवल्या त्या भावूक झाल्या त्यामुळे यात इतकं असं काही मोठा विषय नाही. संजय शिरसाठ, गुलाब गुलाबराव, अब्दुल सत्तार यांनी जे बोलले त्यावर राष्ट्रवादीकडून मी असेन किंवा सुप्रियाताई यांनी आवाज उठवला आहे. तर राहिला प्रश्न अजित पवार यांचा तर त्यावेळी अधिवेशन सरळ चालत नव्हतं, तर राज्याचे इतर प्रश्न होते. त्यामुळे कदाचित अजित पवार यांनी तो प्रश्न मांडला नसेल.