लोकसभेच्या तयारीवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा कोणाला टोमना? म्हणाला, ”आम्ही पण तयार”

| Updated on: Jun 04, 2023 | 2:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पुण्यासह लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर चाचपणी सुरू आहे. तर त्या अनुशंगाणे बैठकांना जोर आला आहे. यावरून पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी छेडलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई : सध्या महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागेवरून धुसपूस पहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पुण्यासह लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर चाचपणी सुरू आहे. तर त्या अनुशंगाणे बैठकांना जोर आला आहे. यावरून पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी छेडलं असता त्यांनी, प्रत्येक पक्षाची तयारी ही असायलाच पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस लोकसभा निवडणुकिच्या पार्श्वभूमिवर आढावा घेत असेल तर आम्ही काही गप्प आहोत अशातला काही भाग नाही. आम्ही देखील आमच्या तयारीला लागलो आहोत. फक्त राजकारणात काही गोष्टी दाखवच्या नसतात. आमचे मित्र पक्ष अभ्यास करत असतात आम्ही ही अभ्यास करत आहोत.

Published on: Jun 04, 2023 02:34 PM
“…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे”, ओडिशा दुर्घटनेवर सुषमा अंधारे यांची भूमिका
पुण्यात लव्ह जिहादविरोधात मोर्चा, नितेश राणे यांनीही घेतला सहभाग