ही थेट जनतेची लूट, अशा शब्दात राऊत यांचा दादा भुसेंवर हल्ला
राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधत त्यांच्यावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या त्यांच्या वक्तव्यासह ट्विटवरून चांगलेच चर्चेत राहत आहेत. राऊत हे बार्शी प्रकरणाच्या ट्विटवरून अडचणीत असतानाच त्यांनी दुसरे ट्विट करत राळ उडवून दिली आहे. यावेळी राऊत यांनी मंत्री दादा भुसेंवर निशाणा साधत त्यांच्यावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा आरोप केला आहे.
भुसे यांच्यावर मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. कंपनीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा करण्यात आलेत. मात्र प्रत्यक्ष कंपनीच्या वेबसाइटवर कमी शेअर्स दाखवण्यात आले आहेत. ही थेट जनतेची लूट आहे, अशा शब्दात राऊत यांनी दादा भुसे यांना इशारा दिला आहे.
Published on: Mar 21, 2023 09:57 AM