राऊत ‘या’ प्रकरणी थेट सीबीआयकडे मागणी करणार
राऊत हे आज बारामतीच्या दौऱ्यावर असून ते भीमा पाटस साखर कारखान्याला भेट देणार आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना ही प्रतिक्रिया दिली
बारामती : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल ईडी आणि सीबीआय या दोन्ही संस्था काय करतात असा सवाल केला होता. तर आज भीमा पाटस साखर कारखान्यातील कथीत 550 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सीबीआयची दारे ठोठावणार असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे पुण्यासह राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राऊत हे आज बारामतीच्या दौऱ्यावर असून ते भीमा पाटस साखर कारखान्याला भेट देणार आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना ही प्रतिक्रिया दिली. यावेळी राऊत यांनी कारखान्यात तब्बल 550 कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी ते थेट सीबीआयकडे कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. त्यासाठी ते सीबीआयला पत्र पाठवार आहेत. तसं झाल्यास राज्यातील राजकारण पुन्हा तापणार आहे.
Published on: Apr 07, 2023 10:57 AM