रोशनी शिंदे मारहाण प्रकरण; ठाणे पोलीस आयुक्तालयाला ठाकरे गट ठाळे ठोकणार

| Updated on: Apr 05, 2023 | 9:31 AM

ठाकरे गट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला मारहाण प्रकरणी काढण्यात येणार आहे. तर याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत

ठाणे : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाली आहे. त्यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आली. तर ही मारहाण शिंदे गटाच्या महिलांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं असून यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तर आज याप्रकरणी ठाकरे गटाकडून ठाण्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारीला मारहाण प्रकरणी काढण्यात येणार आहे. तर याचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. या मोर्चाला काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. तर पोलीस आयुक्तालयाला टाळे ठोकून उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

Published on: Apr 05, 2023 09:17 AM
‘जोतिबाच्या नावाने चांगभल’; जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल
Video : गुलाबराव पाटलांचं भाषण सुरु होतं, लाईट गेली; मग मोबाईलच्या टॉर्चमध्ये भाषण…