“बाळू धानोरकरांना मी भेटण्यासाठी लवकर निघालो, सकाळी पोहचलोही मात्र विमानतळावरच….”; राऊत यांची प्रतिक्रिया

| Updated on: May 30, 2023 | 3:07 PM

त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. तर धानोरकरांच्या निधनाचं वृत्त कळताच राज्यासह देशभरातील नेते मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील धानोरकरांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्ली : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर रुग्णालयात उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली. त्यावरून राज्यात सध्या शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. तर धानोरकरांच्या निधनाचं वृत्त कळताच राज्यासह देशभरातील नेते मंडळींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील धानोरकरांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राऊत यांनी, बाळू धानोरकरांच्या निधनाचा धक्का केवळ काँग्रेसलाच नाही तर शिवेसनेलासुद्धा बसला आहे. धानोरकर हे आमचे एके काळचे सहकारी आणि मित्र होते. धानोरकर हे मुळचे शिवसैनिक. त्यांना शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढायची होती. त्यांना उद्धव ठाकरे यांनी तयारी करण्याच्या सूचना आणि पवानगी दिली होती. मात्र त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन लोकसभा निवडणूक लढली. ते राज्यातले काँग्रसेचे एकमेव खासदार होते. जरी ते काँग्रसमध्ये गेले तरी ते शिवसेनेचं होते.

Published on: May 30, 2023 03:07 PM
“संजय राऊत विसरले की ते 5 वर्ष एनडीचा भाग होते”, नितेश राणे भडकले
तब्बल 65 फूट खोल विहीर खोदूनही विहिरीला पाणी नाही, शेतकरी हतबल अन् …