Bhaskar Jadhav : शिवसेनेने भाजपावर विश्वास ठेवला अन् त्यांनी केसाने गळा कापला, जाधवांनी उदाहरणासहीत स्पष्टीकरण दिले
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी केलेली युती ही देखील फायद्याची राहणार आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळवा हा एक इतिहास आहे. याची नोंदही झाली आहे. 56 वर्ष याची परंपरा आहे. याला विरोध होईल असे वाटत नाही.पण जर विरोध झाला तर शिवसेना ही आग असून विरोध करणारे यामध्ये भस्मसात होतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई : (BJP Party) भाजपाने आतापर्यंत केवळ राजकीय स्वार्थ पाहिले आहे. त्यासाठी त्यांनी अनेक पक्षाबरोबर युती केली आणि ते पक्षही संपवले. मात्र, (Shivsena Party) शिवसेनेने त्यांची संगत सोडली हे योग्यच झाले. गेल्या 25 वर्षात विश्वासाने सेनेने त्यांच्या खांद्यावर गळा ठेवला आणि त्यांनी केसाने गळाच कापला. पण आता नव्याने सुरवात केली जात आहे. शिवाय पक्षप्रमुखांनी त्यांची साथ सोडून आता वेगवेगळ्या पक्षांशी युती करण्यास सुरवात केली आहे. हेच पक्षाच्या हिताचे राहणार असल्याचे (Bhaskar Jadhav) भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.शिवसेना टिकावी ही केवळ शिवसैनिकांचीच इच्छा नाहीतर तर संपूर्ण राज्यातील जनतेची हीच भावना आहे. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी केलेली युती ही देखील फायद्याची राहणार आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळवा हा एक इतिहास आहे. याची नोंदही झाली आहे. 56 वर्ष याची परंपरा आहे. याला विरोध होईल असे वाटत नाही.पण जर विरोध झाला तर शिवसेना ही आग असून विरोध करणारे यामध्ये भस्मसात होतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.