Special Report : अजित पवार गटाच्या आमदारांना छप्पर फाड, मात्र विरोधकांची झोळीत काहीच नाही; पवारांची पॉवर
अजित पवार यांनी अर्थमंत्रालयाच्या चाव्या आपल्या ताब्यात घेताच त्यांनी त्यांनी भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सपोर्ट करणाऱ्या आमदारांना छप्पर फाड निधी दिलाय. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसच्या आमदारांना निधीतून वगळण्यात आलं आहे.
मुंबई, 24 जुलै 2023 | राज्याच्या सत्ता कारणात आता पुन्हा एकदा निधी वाटपावरून रणकंदन होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्रालयाच्या चाव्या आपल्या ताब्यात घेताच त्यांनी त्यांनी भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सपोर्ट करणाऱ्या आमदारांना छप्पर फाड निधी दिलाय. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसच्या आमदारांना निधीतून वगळण्यात आलं आहे. त्यावरून आता जोरदरा टीका होताना दिसत आहे. तर काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी निधी वाटपात अजित पवार यांना भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. तर त्यांच्यानंतर आमदार सुभाष धोंटे यांनी देखील असाच आरोप केला आहे. त्याचर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील केंद्रावर यावरून हल्लाबोल करताना राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. तर भाजप नेते मंत्री गिरिष महाजन यांनी तळे राखेल तोच पाणी चाखेल अस वक्तव्य केल्यानं यावरून राजकारण तापलेलं आहे. तर निधी वाटपावरून राज्यात कसे राजकारण तापलेलं आहे त्यावर हा स्पेशल रिपोर्ट…