मालेगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; कोणा कोणाचा घेणार समाचार?

| Updated on: Mar 26, 2023 | 11:03 AM

आता उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेत आहेत. ही सभा शिवसेना पक्षाचे नेते दादा भुसे यांच्या होम ग्राऊंडवर होत असल्याने कोणाची चिरफाड उद्धव ठाकरे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

मालेगाव : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. यादरम्यान त्यांनी खेड येथे सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटात गेलेल्या नेत्यांसह भाजपचा खरपूस समाचार घेतला होता. तर राज ठाकरे यांच्यावरही निशाना साधला होता. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. आता उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेत आहेत. ही सभा शिवसेना पक्षाचे नेते दादा भुसे यांच्या होम ग्राऊंडवर होत असल्याने कोणाची चिरफाड उद्धव ठाकरे करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मालेगाव येथील मजला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही सभा पार पडणार आहे. ही सभा संध्याकाळी 7 वाजता पार पडणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी भव्य व्यासपीठ आणि एक लाख लोक मावतील एवढी आसनव्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. तर दोन दिवसांपासून खासदार संजय राऊत मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत.

Published on: Mar 26, 2023 11:03 AM
अरे हमारा नेता कैसा हो?…; के. चंद्रशेखर राव यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये बॅनर
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये उर्दूमध्ये बॅनर; दादा भुसे यांचं थेट भाष्य, म्हणाले…