उद्धव ठाकरे यांच्या अॅक्शनमोडवर शंभूराज देसाई यांची टीका म्हणाले, फक्त आमच्यावर…
शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना अॅक्शनमोडवर यायला उशिर झाला असे म्हणत टीका केली आहे.
नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आधी खेड येथे सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटात गेलेल्या नेत्यांसह भाजपवर त्यांनी टीका केली होती. त्यानंतर आता मालेगावमध्ये सभा होत आहे. त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना अॅक्शनमोडवर यायला उशिर झाला असे म्हणत टीका केली आहे.
मुख्यमंत्री असताना ते कधी लोकांच्यामध्ये गेले नाहीत. ठिक आहे आता ते लोकांच्यामध्ये जात आहेत. ते त्यांचे काम करत आहेत. पण त्यांना अॅक्शनमोडवर यायला उशिर झाला. ते आता सभा घेत आहेत चांगले आहे. फक्त आमच्यावर टिका करत आहेत ते काही योग्य नाही. असो, आम्ही आणचे काम करत राहु असे शंभुराज देसाई म्हणाले.
Published on: Mar 26, 2023 11:47 AM