जोपर्यंत शंका दूर होत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर..काय म्हणाले म्हणाले अनिल परब
अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या स्मार्ट मीटर विरोधात आज शिवसेनेच्या शिष्ठमंडळाने अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली आहे. या कंपनीने स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांच्या सर्व शंकाचे निरसन करावे असेही शिवसेनेने म्हटले आहे.
मुंबईत बेस्टने अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीकडील वीजेची स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाने आज अदानी इलेक्ट्रीसी कार्यालयात जाऊन शिष्ठमंडळाने भेट दिली आहे. २७ लाख अल्प उत्पन्न असलेल्या गटाला अदानी कंपनी बिल देत आहे. स्मार्ट मीटर जर आले तर या गरीब कुटुंबांना एक दिवस जरी बिल भरायला उशीर झाला तर वीजेचे कनेक्शन कट होणार आहे. पूर्वी वीज मीटर होते तेव्हा वीज कर्मचारी घरी यायचे तेव्हा आपल्या कळत होते. परंतू आता स्मार्टमीटरमुळे ते थेट कार्यालयातून वीज कट करणार आहेत.त्यामुळे मुंबईच्या ग्राहकांची ही लूट थांबविण्याची जबाबदारी शिवसेनेचे शिष्ठमंडळ निवेदन द्यायला आहे आहे असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. जोपर्यंत ग्राहकांचे संपूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्मार्ट मीटर बसवता येणार नाही असे आम्ही त्यांना सांगितले आणि त्यांनी ते लेखी मान्य केले आहे.तसेच याबाबत एमईआरसीने जनसुनावणी घेतली पाहीजे अशी आमची मागणी आहे. कॅश काऊटंर बंद केले आहेत,सगळं ऑनलाईन केले आहे ते कॅश काऊंटर पुन्हा चालू करण्याची मागणी आम्ही केली आहे. तसेच पाच हजाराच्या वर रोकड स्वीकारली जात नाही ती स्वीकारण्याची मागणी शिवसेनेने केली असल्याचे परब यांनी म्हटले आहे.