शिंदे गाटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढणार; वादग्रस्त वक्तव्यावरून पोलिसांनी उचलंल पुढचं पाऊल
शिरसाट यांनी, सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… असे शब्द वापरले होते
मुंबई : शिवसेनेत फुड पडल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यादरम्यान शिंदे गटाचे नेते शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंवर खालच्या पातळीची टीका केली. शिरसाट यांनी, सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहीत… असे शब्द वापरले होते. त्यावरून अंधारेंनी संजय शिरसाट यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. ज्यावर छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याला 48 तासांत अहवाल देण्याची सूचना करण्यात आल्या होत्या. यानंतर आता पोलिसांनी पुढचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात पोलिसांना एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. ज्यामुळे शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 03, 2023 11:12 AM