हे सर्व सरकार मधली लोक घडवत आहेत, राजन साळवी यांचा घणाघात
साळवी यांनी, गेल्या काही दिवसांपासून acb कडून माझी चौकशी करण्यात आली आहे. आता माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, मोठा भाऊ, त्याची पत्नी यांना आता नोटीस देण्यात आल्याचे म्हटलं आहे
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे सध्या राजकारण चांगलेच तापलेलं आहे. साळवी यांच्या पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला एसीबी नोटीस पाठवली आहे. यावर साळवी यांनी, गेल्या काही दिवसांपासून acb कडून माझी चौकशी करण्यात आली आहे. आता माझ्या कुटुंबातील माझी पत्नी, मोठा भाऊ, त्याची पत्नी यांना आता नोटीस देण्यात आल्याचे म्हटलं आहे. आमदार वैभव नाईक यांना देखील या अगोदर नोटीस पाठविण्यात आली. शिसवेना उध्दव ठाकरे पक्षातील लोकांनाच अशा नोटीसा येत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच जर ‘मी दोषी असेन तर माझ्यावर कारवाई करा. पण कुटुंबाला विनाकारण त्रास देऊ नका’ असे आवाहन देखील साळवी यांनी केलं आहे.