राऊत यांचा शिंदे यांच्या मंत्रीवर पलटवार, म्हणाले… दाढीला आग का लागली?
दादा भुसेंकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या दाढीला काल जी आग लागली ती विझवण्याचं काम ते करत आहेत. मी व्यक्तिगत कधीच कुणावर आरोप केला नाही
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा छेडलं आहे. यावेळी राऊत यांनी, भुसे यांच्यावर साखर कारखाना प्रकरणी जोरदार टीका केली.
दादा भुसेंकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या दाढीला काल जी आग लागली ती विझवण्याचं काम ते करत आहेत. मी व्यक्तिगत कधीच कुणावर आरोप केला नाही. व्यक्तिगत आरोप करतही नाही. मी कुठे म्हणतो, तुम्ही अमूक केलं, तमूक केलं. हिशोब द्या. शेतकरी हिशोब मागत आहे. फक्त हिशोब मागितल्यावर तुमची दाढी का जळावी? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Published on: Mar 22, 2023 12:29 PM