अन्नाची शपथ घेऊन… ; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर पलटवार
मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर करण्यात आला आहे. त्या आरोपांना दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत राज्य सरकारमधील मंत्री दादा भूसे यांच्यावर ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसे यांच्यावर करण्यात आला आहे. त्या आरोपांना दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं. दादा भुसे म्हणाले की, आम्हाला नेहमी गद्दार म्हणणारे, मात्र आमच्याच मतांवर निवडून येणारे महागद्दार आहेत. त्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
आदित्य ठाकरे यांनी, ज्यांनी अन्नाची शपथ घेऊन आमच्याशी गद्दारी केली अशा लोकांची आणि अशा लोकांबद्दल काय टीका करायची. त्याच्यांबद्दल काय उत्तर द्यायचं. जे आमच्यावर टीका करत आहेत, हे स्वतः महागद्दार आहेत. यांनी आम्हाला धोका दिलाय हे कुणालाही धोका देऊ शकतात.
Published on: Mar 21, 2023 02:19 PM