संजय राऊत यांची मुस्लिम बांधवांशी चर्चा; उपस्थितीसाठी विशेष प्रयोजन
संजय राऊत हे दोन दिवसांपासून मालेगाव दौऱ्यावर आहे. राऊत यांच्यासह स्थानिक नेते सभेची जोरदार तयारी करीत आहे
नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करीत आहे. त्यामध्ये नुकतीच खेडची सभा झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे मालेगावमध्ये सभा घेत आहे. यासाठी संजय राऊत हे दोन दिवसांपासून मालेगाव दौऱ्यावर आहे. राऊत यांच्यासह स्थानिक नेते सभेची जोरदार तयारी करीत आहे. उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी हजर राहवं यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यापार्शवभूमीवर राऊत यांनी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष युसूफ भाई नॅशनल वाले यांच्या घरी दिली भेट. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांशी पावर लूम संदर्भातील विषयांवर केली चर्चा.
Published on: Mar 26, 2023 09:40 AM