राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार असेल, शिवसेनेअंतर्गत निर्णय, सूत्रांची माहिती

| Updated on: May 17, 2022 | 8:48 PM

संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना करत आपण राज्यसभेसाठी अपक्ष उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. तसंच सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, संभाजीराजे यांची राज्यसभेसाठीची वाट खडतर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेना सहाव्या जागेवर उमेदवार देणार असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलंय.

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी जुलैमध्ये निवडणूक (Rajyasabha Election) होणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. अशावेळी सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. संभाजीराजेंच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिसाद दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा संभाजीराजेंना पाठिंबा असल्याचं पवार काल म्हणाले होते. मात्र, शिवसेना राज्यसभेसाठी दोन उमेदवार देणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Published on: May 17, 2022 08:48 PM
अरे कुणी शेतकऱ्याच्या द्राक्षाला भाव देतं का रे भाव ? शेतकरी हतबल
Special Report | व्हायरल ‘शिवलिंगा’चा व्हिडीओ ‘ज्ञानवापी’तला?-TV9