Special Report | आगामी निवडणुकीत धनुष्यबाणाचं चिन्ह गोठणार?

| Updated on: Jul 26, 2022 | 11:46 PM

जोपर्यंत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही असं शिवसेनेनं केलेल्या याचिकेत म्हटलंय. 8 तारखेपर्यंत पुरावे द्या हा निवडणूक आयोगानं दिलेला आदेश असंवैधानिक असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलंय.

मुंबई : धनुष्यबाण कुणाचा याची लढाई निवडणूक आयोगात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केलाय. धनुष्यबाण आमचाच आहे. खरी शिवसेना आम्हीच आहोत. असा दावा करत शिंदे गट निवडणूक आयोगात गेला. आणि निवडणूक आयोगानं दोन्ही बाजूंना 8 तारखेरपर्यंत पुरावे देण्याचे आदेश दिलेत.  निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात आता शिवसेना सुप्रीम कोर्टात गेलीय. एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाला सुनावणी करण्यास स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेने केलीय. जोपर्यंत बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होत नाही तोपर्यंत खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही असं शिवसेनेनं केलेल्या याचिकेत म्हटलंय. 8 तारखेपर्यंत पुरावे द्या हा निवडणूक आयोगानं दिलेला आदेश असंवैधानिक असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलंय. शिवसेनेची ही याचिका सुप्रीम कोर्टानं स्वीकारलीय. या याचिकेवर आता 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सूचक विधान केलंय. निवडणूक आयोग जे चिन्ह देईल त्या चिन्हावर पुढच्या निवडणुका लढणार असल्याचं शिंदे गटानं जाहीर केलंय. शिंदे गटानं आता मिळालं तर धनुष्यबाण आणि नाही मिळालं तर धनुष्यबाणाशिवाय निवडणुका लढण्याची तयारी केलीय. प्रश्न निवडणूक आयोग आणि कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळं धनुष्यबाण हे चिन्हच गोठवली जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय.

Special Report | मंत्रिमंडळ विस्तारासाठी ‘तारीख पे तारीख’
Special Report | आधी संजय राऊत,आता आदित्य ठाकरे टार्गेटवर