शिवसेनेवाले बाबरी खटल्यात आरोपी तर भाजपवाले रणछोडदास, संजय राऊत यांचा हल्लाबोल

| Updated on: Dec 29, 2023 | 9:22 PM

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जशी जवळ येत चालली आहे तशी या वरुन भाजपा आणि शिवसेना या पक्षांमध्ये एकमेकांवर टिकाटिपण्णी करण्याची संधी एकही जण सोडत नाहीए..यावरुन आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बाबरी पडली त्या खटल्यात शिवसैनिक आरोपी आहेत तर भाजपावाले रणछोडदास असल्याचे म्हटले आहे.

 मुंबई | 27 डिसेंबर 2023 : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे राम मंदिरावरुन श्रेयवादाची लढाई शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजपामध्ये सुरु झाली आहे. बाबरी मस्जिद पडली तेव्हा भाजपवाले बिळात लपले होते असा हल्लाबोल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बाबरी मस्जिद खटल्यात शिवसेनेवाले आरोपी आहेत, तर भाजपवाले रणछोडदास असल्याचेही टिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, बाबरी मस्जिद आंदोलनाशी कोणाचे काय योगदान होते? हे संजय राऊत यांनी आम्हाला सांगू नये. या प्रकरणात भाजपा नेते नितेश राणे यांनी राम मंदिराशी संबंधीत उद्धव ठाकरे यांचा संबंध काय ? राम मंदिर आंदोलनाशी संबंधित ठाकरे यांचा एकतरी फोटो दाखवा असे आव्हान नितेश राणे यांनी केला आहे.

Published on: Dec 27, 2023 06:26 PM
कोल्हे यांच्या विरोधात दादा देतील तो उमेदवार खासदार होणार, रुपाली पाटील यांची ग्वाही
केंद्राच्या कांदा निर्यात बंदीने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र, शेतकऱ्यांचा खर्चही निघेना