भाजप शिंदे गटावर अन्याय करतयं? आणखी एक नेता आला समोर; काम करु देत नसल्याचा पालकमंत्र्यांवरच आरोप
खासदार श्रीकांत शिंदे यानांच आता तेथे विरोध होताना दिसत आहे. यावरून शिंदे यांनी आपण राजीनामा देण्यास तयार आहोत असे म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर पडदा टाकला असतानाच आता पुन्हा दुसरा वाद समोर आला आहे.
माढा (सोलापूर) : गेल्या दोन दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात वाद सुरू आहे. हा वाद फक्त एका अधिकाऱ्याच्या बदलीवरून सुरू आहे. त्यावरून थेट खासदार श्रीकांत शिंदे यानांच आता तेथे विरोध होताना दिसत आहे. यावरून शिंदे यांनी आपण राजीनामा देण्यास तयार आहोत असे म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर पडदा टाकला असतानाच आता पुन्हा दुसरा वाद समोर आला आहे. हा वाद सोलापूर जिल्ह्यातील आहे. येथे देखील शिवसेना व भाजपा मध्ये धुसफूस सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी शिंदे गटाच्या नेत्यांना भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेसह भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर वेळ देत नाहीत. आमची कामे करत नाहीत. उलट भाजपकडून शिंदे गटावर मोठा अन्याय सुरु असल्याचा आरोप शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटेंनी प्रसार माध्यमासमोर केलाय. त्यामुळे सेना भाजपा मधली धुसफूस अधिकच वाढण्याची चिन्हे वर्तवली जात आहेत.