शिवसेनेची उभारी! सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य विजयी
माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा झटका बसलाय. सोलापुरात देशमुखांचं मोठं वर्चस्व आहे. पण चिंचपूरमधला हा पराभव त्यांना मोठा धक्का देणारा आहे. आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.
सोलापूर: राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज्यातील निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष होतं. अन् अश्यात सोलापुरात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलाय. यात दक्षिण सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या (Shivsena)उध्दव ठाकरे (Uddhav Thackrey) गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे.माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा झटका बसलाय. सोलापुरात देशमुखांचं मोठं वर्चस्व आहे. पण चिंचपूरमधला हा पराभव त्यांना मोठा धक्का देणारा आहे. आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.